लो.टि.स्मा.त शुक्रवारी अरविंद जाधव पुतळा अनावरण समारंभ

चिपळूण : अत्यंत निरलस आणि निरपेक्ष भावनेने साहित्य क्षेत्रात राहिलेले लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष आणि नाटककार स्व. अरविंद तथा अप्पासाहेब जाधव यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आ. शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजता बाळशास्त्री जांभेकर सभागृहात संपन्न होईल. कै. आप्पासाहेब जाधव यांनी समरस भावनेने वाचन मंदिराची सेवा केली. अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व जाधव यांच्या कार्यकाळात लोकमान्य वाचन स्मारक वाचन मंदीराचे कार्य व संस्थेचे उपक्रमही अधिक वाढले. वाचनालयाने आपल्या अपरान्त संशोधन केंद्रालाही त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याच्या स्मृति जीवंत ठेवल्या आहेत. लो.टि.स्मा.च्या कार्यकारिणीने त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची प्रेरणा सर्वांना मिळावी या भावनेने हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे आणि कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button