
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खुल्या समुद्रात पिंजर्यातील पहिले मत्स्यसंवर्धन
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खुल्या समुद्रात पिंजर्यातील पहिले मत्स्यसंवर्धन केले आहे. यासंदर्भात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने मच्छिमार बांधवांकरिता तीन दिवस मार्गदर्शन करण्यात आले.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रत्नागिरी येथील मच्छिमार भगिनींना खुल्या समुद्रातील मत्स्य संवर्धन प्रकल्प मंजूर झाले आहेत. पैकी तीन प्रकल्प हे जयगड येथील मच्छिमार भगिनींना मंजूर झाले आहेत. या भगिनींना जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्यावतीने सहकार्य करण्यात येत आहे. मार्गदर्शन कार्यक्रमात दोन दिवस प्रकल्पाची तांत्रिक बाजू आणि शासनाच्या मत्स्यविषयक योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तिसर्या दिवशी प्रत्यक्ष पिंजर्यातील मत्स्य संवर्धन प्रकल्पस्थळी मार्गदर्शन करण्यात आले. मत्यअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राध्यापक डॉ. मंगेश शिरधनकर आणि सहकारी प्राध्यापक तौफिक काझी, निलेश मिरजकर, डॉ. राकेश जादव आणि सुशिल कांबळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com