
केंद्र सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिला
देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलै वरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
www.konkantoday.com