
वाशिष्ठीचा गाळ काढताना आढळले चार नाग असलेले शिवलिंग
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना बहादूरशेख येथे शिवलिंग आढळून आले आहे. या शिवलिंगावर चार नाग असल्याचे दिसून येत आहे. जेसीबीने गाळ काढणार्या कर्मचार्याला पात्रात हे शिवलिंग आढळून आले. अनेक भाविकांनी दुग्धाभिषेकाने या शिवलिंगाची पूजा करून दर्शन घेतले. चार नाग असलेले शिवलिंग दुर्मीळ असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात हे शिवलिंग आढळण्यामागे नेमके कारण काय असावे? याचा अभ्यासकांकडून शोध घेतला जात आहे.