खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी संतोष पावरी तर उपाध्यक्ष पदी सुधीर वासावे यांची बिनविरोध निवड

●खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्ह्याच्या पंचवार्षिक निवडणूकिचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक वि. वाघमारे यांनी आज दि.२ फेब्रुवारी,२०२२ रोजी जाहीर केला.व खालील प्रमाणे उमेद्वार बिनविरोध निवडून आले आहेत.
●मतदार संघ:- अ)रत्नागिरी तालुका(सर्वसाधारण): सुधीर महादेव वासावे,कमलाकर धोंडू हेदवकर,वासुदेव भिकाजी वाघे,दिनेश बाबाजी डोर्लेकर ब)राजापूर:तालुका(सर्वसाधारण):मदन गुणाजी डोर्लेकर.क) गुहागर तालुका(सर्वसाधारण): दिनेश काशिनाथ जाक्कर, रमेश केशव जाक्कर,संदीप विश्राम वणकर ,कृष्णा पांडुरंग तांडेल,ड) दापोली तालुका(सर्वसाधारण): वैभव लक्ष्मण पालशेतकर
इ) विशेष मागास प्रवर्ग:संतोष जनार्दन पावरी,फ) महिला राखीव:ध्रुवी किशोर लाकडे,दीप्ती देवेंद्र कोलथरकर

●खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा या सहकारी संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित संचालक यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 73 कब (12) व महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम 2014 मधील नियम 77 अनुभवी तसेच संस्थेच्या नोंदणीकृत उपविधी तील तरतुदी नुसार संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीकरिता श्री दिपक वाघमारे अध्यासी अधिकारी लेखापरिक्षक श्रेणी-2 यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वा.खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा प्रधान कार्यालय,खारवी समाज भवन रत्नागिरी येथे नवनिर्वाचित संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.नवनिर्वाचित संचालक मधून निवडावयाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक झाली.

●खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी संतोष पावरी तर उपाध्यक्ष पदी सुधीर वासावे यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली.

●अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी नंतर सर्व संचालक मंडळाचा जल्लोषपूर्ण वातावरणात सन्मान सोहळा करण्यात आला.

●तसेच संस्थेची वरिष्ठ लिपिक कु.प्रथमा मिरजुळकर हिने कालच जी.डी.सी. आणि ए या परीक्षेत उज्जवल यश संपादन केल्या बद्दल तिचा संस्थेच्या वतीने उचित सन्मान शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

●संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सभासद व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button