दापोलीतील बंड शमले; सेनेच्या बंडखोर उमेदवाराचे आघाडीच्या उमेदवाराला मत

नगराध्यक्षपदी ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची निवड

दापोली : नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात बंड केलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत स्वतःचे मतदान हे पक्षाच्या आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवार ममता मोरे यांना करून सभागृहात आपली बंडाची तलवार म्यान केली. त्यामुळे दापोलीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या ममता मोरे या विराजमान झाल्या. उप नगराध्यक्षपदासाठी खालिद रखांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दापोली नगर पंचायत नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी दि. 11 रोजी दापोली नगरपंचायत येथे पार पडली. यात नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवार ममता मोरे यांना 17 पैकी 14 नगर सेवकांनी हात उंचावून मतदान केले. यावेळी शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी शिवानी खानविलकर यांना फक्त अपक्ष दोन नगरसेविकांनी मतदान केले. तर भाजपच्या नगरसेविका तटस्थ राहिल्या. यावेळी शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी स्वतःचे मत देखील आघाडीच्या अधिकृत उमेदवार मोरे यांना दिले. त्यामुळे नगराध्यक्षपदी आघाडीच्या ममता मोरे विराजमान झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button