
पावसाच्या शेतीने वाढेल भूजल पातळी,पावसाची शेती (रेनवॉटर फार्मिंग) नावाची एक नवी व्यवस्था
चिंताजनकरित्या खाली गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी पुन्हा वर आणण्यासाठी सरकारसह प्रत्येकजण आपापल्या परीने अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील नागरिक सुनिल प्रसादे यांनी पावसाची शेती (रेनवॉटर फार्मिंग) नावाची एक नवी व्यवस्था पागोळी वाचवा अभियानच्या माध्यमातून विकसित केली आहे. त्यांच्या या कल्पनेने सर्वत्र कौतूक होत आहे.
आकाशातून मोठ्या प्रमाणात नियमितपण पडणारे पावसाचे पाणी त्याच प्रमाणात भूगर्भात जिरवण्यात आपल्याला येत असलेल्या अपयशामुळे आज आपण पाणीटंचाई आणि जमिनीचे वाळवंटीकरण यासारख्या समस्यांचा सामना करत आहोत, असे सुनिल प्रसादे म्हणतात. आपल्याला जर खरोखरच आपण रहात असलेल्या भागाच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने वर आणायची असेल तर त्या ठिकाणच्या लोकांनी पागोळी वाचवा अभियानाच्या पावसाची शेती ही व्यवस्था स्वीकारायला हवी आणि तिची अंमलबजावणी करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे. www.konkantoday.com