‘तुतारी’वर झळकताहेत आघाडीच्या विकासकामांचे बॅनर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आघाडी सरकारने आपला महाराष्ट्र, आपले सरकार ही घोषणा दिली होती. त्यानुसार विविध लोकहिताच्या योजनाही राबविल्या आहेत. त्या माहितीचे फलक रत्नागिरीत येणार्या दादर टर्मिनस-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसवर लावण्यात आले आहेत. याद्वारे आघाडी सरकारने विकासकामे केल्याचे लोकांपर्यंत पोचवण्यात येत आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकहिताच्या योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कोकणवासीयांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला आहे. राज्यभरात राबविलल्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी तुतारी एक्स्प्रेसवर रंगीत माहिती फलक लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे छायाचित्रही त्यावर झळकले होते. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही नावे त्यामध्ये आहेत.