जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत गुहागरमधील ऐश्वर्या फुणगुसकर तृतीय

गुहागर : ‘ग्लोबल सायबर पीस चॅलेंज’ या जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत गुहागरमधील ऐश्वर्या फुणगुसकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. सायबर पीस फाऊंडेशनने मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडिया, सायबर सिक्युरीटी चॅलेंज यु. के. (इंग्लंड), सायबर सिक्युरीटी सेंटर ऑफ एक्सलंन्स, इंडियाना युनिव्हरसिटी ब्लुमिंग्टन, ऑल इंडिया ऑफ टेक्नीकल एज्युकेशन, वर्ल्ड वाईड वेब फाऊंडेशन, हॅकर लॅब सायबर रेंज यांच्या संयुक्‍त विद्यमाने ग्लोबल सायबर पीस चॅलेंज 3.0 ,सायबर पॉलिसी अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी चॅलेंज 2021 ही जागतिक पातळीवरील ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर विशेष स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची 5 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत प्राथमिक फेरी व दि. 28 व 29 जानेवारी या दिवशी अंतिम फेरी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जगातील अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या तंत्रज्ञानात प्रगत देशांबरोबरच सुमारे 56 देशांनी सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवरचे सुमारे 300 पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button