रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या १३ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सातजणांची यादी जिल्हा पोलिसांनी जाहीर केली
रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या १३ वर्षांपासून बेपत्ता असलेले आणि अद्याप शोध न लागलेल्या सातजणांची यादी जिल्हा पोलिसांनी जाहीर केली आहे. यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.यामध्ये रत्नागिरीतील बालसुधारगृह तसेच माहेर संस्थेतील काहींचा समावेश आहे.
अलमास बिलाल कुंभार्लीकर उर्फ अलमास नयीन सावंत (वय २५, रा.अलोरे मोहल्ला, ता. चिपळूण) हे २२ फेब्रुवारी २०२१ पासून काविळतळी, चिपळूण येथून बेपत्ता आहेत. सायंकाळी साडेचार ते पाच या दरम्यान ते बेपत्ता झाले. त्यांची उंची ५ फुट ४ इंच, रंग गोरा, केस लांब कुरळे, अंगावर गुलाबी टॉप असे वर्णन आहे. सौ.सुषमा योगेश शिंदे (वय २८, रा. पिंपळीखुर्द सोनारवाडी, ता. चिपळूण) या ४ फेब्रुवारी २०२० ला सकाळी सहा वाजता पिंपळी खुर्द सोनारवाडी येथून बेपत्ता झाली आहे. त्यांची उंची ५ फुट, अंगाने मजबूत, रंग गोरा, गळ्यांमध्ये सोन्याचे एक डौवलीचे छोटे मंगळसुत्र, सोबत काळ्या रंगाची पर्स व मोबाईल आहे. मधुकर रामचंद्र जोधळे, (५५, रा. येगाव ढोगबाववाडी, चिपळूण) हे २ जुलै २०२१ ला दुपारी साडेबाराच्या सुमारास येगाव-ढोगबाववाडी येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा रंग सावळा, उंची ५ फुट ४ इंच, दारु पिण्याचे व्यसन आहे.
माला अमिनसा बागवान (१५, मुळ रा. अलगर, ता. सिंदगी, जि. विजापूर सध्या रा. रिमांडहोम रत्नागिरी) हा ३ नोव्हेंबर २००९ ला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारात रिमांडहोम रत्नागिरी येथून बेपत्ता झाला आहे. मधुकर रामचंद्र जोधळे (५५, रा. येगाव ढोगबाववाडी, चिपळूण) हे २ जुलै २०२१ ला दुपारी साडेबाराच्या सुमारास येगाव ढोगबाववाडी येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा रंग सावळा, उंची ५ फुट ४ इंच आहे. आसाराम विष्णू म्हस्के (३१, रा. माहेर संस्था, समर्थ नगर, हातखंबा) हे २३ डिसेंबर २०१६ ला माहेर संस्थेतून बेपत्ता झाले आहेत. नासिर हुसेन (४५, माहेर संस्था, हातखंबा) येथून १४ जुलै २०१६ ला माहेर संस्थेतून बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तींबद्धल आपल्याला काही माहिती मिळाल्यास किंवा कोठे आढळल्यास संबंधित पोलिसांना कळविण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
www.konkantoday.com