मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथील, उघड्या गटाराची दखल घेत नगरपरिषदेने कार्यवाही केली
रत्नागिरी-मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे नव्याने बांधण्यात आलेले गटार वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड डोकेदुखी ठरत होते. नव्याने बांधण्यात आलेल्या उघड्या गटारामुळे अपघातही झाले होते. ही प्रसिद्ध झाल्यावर रत्नागिरी नगर परिषदेने त्या वृत्ताची तातडीने दखल घेत त्या ठिकाणी बांधकाम केले.
मारुती मंदिर ते मजगाव रोड रस्ता संध्याकाळी गर्दीने फुलून गेलेला असतो. संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतुक आणि पादचारी यांची ये-जा चालू असते. त्यामुळे रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी गटाराच्या बाजूने जात असतात. मात्र आयसीआय बँकेच्या विरुद्ध दिशेला गटार आहे ते गटार उघडे होते. त्यामुळे रात्रीच्या काळोखात या उघड्या गटारांचा भाग दिसून येत नव्हता. गेल्या आठ दिवसापूर्वी या गटारामध्ये एक गाय पडलेली होती. तसेच बुधवारी रात्री याच गटारामध्ये एक व्यक्ती पडली त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या घटनेची दखल कोकण टूडे ने घेत प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत त्या गटारावर बांधकाम करण्यात आले. परिसरातील नागरिकांकडून याबाबत आभार व्यक्त करण्यात आले.