एक स्मरणीय भेट


माझ्या मुंबई दूरदर्शन मधील नोकरीच्या दिवसात मला अनेक दिग्गज व्यक्तिमत्वा ना भेटता आलं जवळून पाहता आलं 24 एप्रिल 2004 हा दिवस मुंबई दूरदर्शनच्या इतिहासातलं एक सुवर्णपान या दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्र भारतरत्न लतादीदी मंगेशकर मॅडम आल्या होत्या निमित्त होतं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचं आदरणीय दीदी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या अर्थात माननीय लतादीदींनी या कार्यक्रमाला यावं अशी तेव्हा चे संचालक श्री मुकेश शर्मा यांची इच्छा होती अर्थात इच्छा सफल झाली ती केवळ नाट्यनिर्माते स्वर्गीय मोहन वाघ यांच्यामुळे श्री मोहन वाघ साहेब आणि आदरणीय लतादीदींचे कौटुंबिक मैत्री ऋणानुबंध होते लतादीदींनी कार्यक्रमाला यायला हवा ही सर्वांची इच्छा होती पण प्रभू कुंज पर्यंत अर्थात दिन पर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न होता अचानक स्वर्गीय नाट्यनिर्माते मोहन वाघ साहेब यांची आठवण झाली श्री वाघ साहेब आणि लतादीदींचे कौटुंबिक ऋणानुबंध होते मी मोहन वाघ साहेबांना फोन केला संचालकांचा निरोप आणि इच्छा व्यक्त केली श्री वाघ साहेब नेहमीप्रमाणे म्हणाले काम होऊन जाईल दीदी दूरदर्शन केंद्राची याव्यात ही तुमची इच्छा आहे ना पूर्ण होईल त्यानंतर श्री वाघ साहेबांनी या कार्यक्रमासाठी दीदींची भेट घेतली आणि भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी सह्याद्री नवरत्न पुरस्कार समारंभाच्या अस्मरणीय संध्याकाळी मुंबईत वरळीच्या दूरदर्शन केंद्रात पोहोचल्या तो दिवस उपस्थित सर्वांनाच विशेष करून दूरदर्शन परिवाराला आनंद परभणी होता लतादीदींच्या पीए कडून आधीच निरोप मिळाला होता त्या फक्त अर्धा तास कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम सुरू झाला दीदींच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झालं आणि पुढे अर्ध्या तासात ऐवजी संपूर्ण तीन तास सह्याद्री नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ झाला या जगविख्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वांना दिलखुलास आनंद घेतला जाताना दूरदर्शनच्या संचालकांच्या केबिन मधल्या अभिप्राय नोंदवहीत आपल्या हस्ताक्षरात तरी सुंदर चारोळी लिहिल्या आज तो अमोल ठेवा आहे भारतरत्न दीदींच्या जाण्याने सभोवताल शोकाकुल आहे त्या दिवशीची त्यांची स्मरणीय भेट आणि त्यांच्या सोबतचे छायाचित्र माझ्यासारख्याला ऐतिहासिक ठेवा आहे भारतरत्न आदरणीय लतादीदी मंगेशकर मॅडमला भावपूर्ण आदरांजली
जयु भाटकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button