
चिपळूण तालुक्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना
चिपळूण तालुक्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी त्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
घरी कोणीही नसताना हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पन्नासहून अधिक महिलांनी चिपळूण पोलीस स्थानकावर धडक देत त्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करत त्याबद्दल निवेदन दिले आहे.
www.konkantoday.com