वैभववाडी – एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच,गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळली.दोन प्रवासी गंभीर जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी – एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे.चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. आज पहाटे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. एडगाव सर्व्हीसींग सेंटर नजीक हा अपघात घडला. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रॅव्हल्स मधून एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

मुंबईहून गोव्याला टेंपो ट्रॅव्हल्स (एमएच 47 वाय 2522) ने निघाले होते. करुळ घाट उतरून गाडी एडगाव येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात शीतल चप्पा वय 36 रा. मुंबई व प्रकाश मंधानिया वय 33 रा. मुंबई हे जखमी झाले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button