रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
रत्नागिरी : ग्राहकांसाठी हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना देताना असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, सुनील देसाई, सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, गणेश धुरी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी आठवडा बाजारासह अनेक व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांसाठी 10 वाजेपर्यंत नियम ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर हॉटेलमधून होम डिलिव्हरीची सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेलसाठी 50 टक्के क्षमतेला परवानगी दिली आहे. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमाव बंदी आदेशाची बंदी उठवण्यात आलेली असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना किमान रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com