दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड?
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड झाल्याचं दिसून आलं आहे. आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.ममता मोरे यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या शिवानी खानविलकर यांनी अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला निवडणुकीनंतर अवघ्या 15 दिवसांत झटका दिला असून या त्यांच्या कृतीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीत खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com