
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढीचा लाभ घ्यावा शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. या प्रश्नपेढ्यांमुळे विद्यार्थांचा सराव होऊन, त्यांना परीक्षेसाठी मदत होईल असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले
www.konkantoday.com