
काही वेळापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प
गेल्या काही वेळापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क बंद आहे.याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचं काम करत असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जियोचं नेटवर्क ठप्प असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे.
याचा जियोच्या ग्राहकांना फटका बसत आहे.
www.konkantoday.com