
एसटी बंदने सामान्य जनतेचे हाल सुरूच , तोडग्याबाबत दोन्ही बाजूने हालचाली नाहीत
राज्यात सुमारे तीन महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. हा तोडगा नक्की कधी निघणार असून वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल सामान्य प्रवासी आणि विद्यार्थी विचारत आहेत. महाविकास आघाडीकडे तीन पक्षांचे बळ असतानाही यातून मार्ग का काढला जात नाही, असे प्रवासी बोलू लागले आहेत. सत्ताधार्यांनी एसटी महामंडळाला वार्यावर सोडले आहे. त्यामुळे कर्मचारीसुद्धा आता वेगवेगळे व्यवसाय करू लागल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात हजर कर्मचार्यांचा आकडा ७०० च्या पुढे जात नाहीये. त्यामुळे वाहतूक सुरळीत करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. जिल्ह्यात सुमारे १० टक्के वाहतूक सुरू आहे.
www.konkantoday.com