मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज स्क्रॅप करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या हालचाली सुरू
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेले बसरा स्टार जहाज स्क्रॅप करून किनारा मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.येत्या ३ जूनला हे जहाज अडकून दोन वर्षे पूर्ण होतील. तरी या जहाजाच्या एजन्सीने ते काढण्याच्यादृष्टीने अपेक्षित पुढाकार न घेतल्याने ही प्रक्रिया लांबली. आता भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीच्या काही परवानग्या घेऊन हे जहाज भांगारात काढले जाणार आहे. चार दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. स्थानिक उद्योजकांनी हे जहाज भंगारात काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे
www.konkantoday.com