न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कारण, दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नितेश राणे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी कणकवली कोर्टानं नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दोन दिवसांत नितेश राणे यांना गोव्यातील राणेंच्या मालकीच्या हॉटेलमध्ये घेऊन जात चौकशी करण्यात आली. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता नितेश राणे आणि राकेश परब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नितेश राणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्यासाठी आम्ही युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई होईल. आता लगेच सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला जाईल. आज लगेच त्यावर सुनावणी होणार नाही. पण पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिलीय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button