
दादर-सावंतवाडी मार्गावर आंगणेवाडी यात्रा व होळीसाठी खास रेल्वे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेकरिता मुंबईतून येणार्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. याशिवाय दादर-सावंतवाडी मार्गावर होळीसाठी एक गाडी सोडण्यात येणार आहे.
आंगणेवाडीसाठी सोडण्यात येणार्या गाड्यांमध्ये २३ फेब्रुवारीला एलटीटीहून रात्री पावणेबारा वाजता एक गाडी सुटेल. ती २४ फेब्रुवारीला सावंतवाडीला सकाळी १० वा. पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास सावंतवाडीहून त्याच दिवशी सकाळी ११ वा. सुरू होईल. ती गाडी त्याच रात्री ११ वा. एलटीटीईला पोहोचेल. गाडीला प्रथम एसी १, टू टायर एसी १, थ्री टायर एसी ५, द्वितीय श्रेणी शयनयान ११ आणि बसण्याकरिता ३ डब्यांसह एकूण २३ डबे असतील. दुसरी गाडी दादर-सावंतवाडी मार्गावर १६ आणि १९ मार्चला सोडण्यात येणार आहे. ही गाडी दादर येथून दुपारी १२ वा. सुटेल आणि रात्री ११ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास सावंतवाडीहून १६ आणि १९ मार्चला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल. www.konkantoday.com