अभाविपद्वारे रत्नागिरी मध्ये विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन
राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात राज्य शासनाने केलेले बदल मागे घेण्यासाठी ३ फेब्रुवारी पासून राज्यातील विविध महाविद्यालयात स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन राबविण्यात येत आहे. रत्नागिरी मध्ये देखील विविध महाविद्यालयात अभाविप रत्नागिरी शाखेद्वारे हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.
राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर कोणतीही चर्चा होऊ न देता लोकशाही पायदळी तुडवून गांधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंविधानिक पद्धतीने पारित केला आहे. बदल केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढणार आहे. विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन या कायद्याद्वारे करत आहे.
विद्यापीठ आणि शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाचा विरोध रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने पुढे येऊन करत असल्याचे या अभियानाच्या माध्यमातून दिसून येत आहे – कौसर नाईक (शहरमंत्री, अभाविप रत्नागिरी)
सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावे, यासाठी अभाविप राज्यभरातील महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान राबवत आहे. राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यात केलेल्या दुरुस्त्या मागे घ्याव्यात अन्यथा अभाविप हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपात करेल – कोमल कुडपकर(प्रदेश सहमंत्री, अभाविप कोंकण)