गटार की मृत्यूचा सापळा; गोडबोले स्टॉप जवळील गटार ठरतंय डोकेदुखी
रत्नागिरी-मारुती मंदिर गोडबोले स्टॉप येथे नव्याने बांधण्यात आलेले गटार वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. नव्याने बांधण्यात आलेले गटार की मृत्यूचा सापळा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मारुती मंदिर ते मजगाव रोड रस्ता संध्याकाळी गर्दीने फुलून गेलेला असतो. संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतुक आणि पादचारी यांची ये-जा चालू असते. त्यामुळे रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी गटाराच्या बाजूने जात असतात. मात्र आयसीआय बँकेच्या विरुद्ध दिशेला गटार आहे ते गटार काही अंशी उघडे आहे. त्यामुळे रात्रीच्या काळोखात या उघड्या गटारांचा भाग दिसून येत नाही. गेल्या आठ दिवसापूर्वी या गटारामध्ये एक गाय पडलेली होती. तसेच बुधवारी रात्री याच गटारांमध्ये खालील इस्माईल पांगरकर वय ६८ हे गृहस्थ रस्त्याने जात असताना त्यांचा तोल जाऊन या गटारांमध्ये पडले त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. यामुळे या अपघाताला जबाबदार कोण? असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.
जर एखाद्या वेळेला या रस्त्यावरती लोकांची वर्दळ नसेल आणि एखादी दुर्घटना घडली किंवा यामध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रत्नागिरी नगरपरिषदेने व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.