
केरळचे लोकप्रिय सर्पमित्र वावा सुरेशची प्रकृती आता धोक्या बाहेर
केरळचे लोकप्रिय सर्पमित्र वावा सुरेश सापाने चावा घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी झगडत होते. परंतु ते आता धोक्याबाहेर आहेत. त्यांना गुरुवार ३ जानेवारीला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे.कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक टी के जयकुमार यांनी सांगितले की, सुरेश यांनी स्वतःहून श्वास घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. तसेच पुढील २ दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
सुरेश यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष वैद्यकीय पथक स्थापन केले आहे. केरळमधील प्रत्येक घरातील लोक सुरेश यांना ओळखतात. त्यांनी आतापर्यंत ५०,००० पेक्षा जास्त सरपटणाऱ्या जीवांना वाचवले आहे. नॅशनल जिओग्राफिक आणि अॅनिमल प्लॅनेट चॅनेलनेही त्यांच्यावर चित्रीकरण केले आहे. केरळमध्ये सुरेश यांना ‘स्नेक मॅन ऑफ केरळ’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत १९० पेक्षा अधिक किंग कोब्राचे प्राण वाचवले आहेत. ३१ जानेवारी रोजी कोट्टायम येथील मानवी वस्तीतून सापाची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना ४८ वर्षीय सुरेश यांना कोब्राने चावा घेतला होता.
www.konkantoday.com