
आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले आहे. दरम्यान पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीची सर्व व्यवस्थेची पाहाणी केली न्यायालयीन निर्णयाप्रमाणे जेवण व्यवस्था बघितली जाईल, असे सांगितले. तसेच राणे यांच्या समवेत जिल्हा मुख्यालयातील पोलीस पथक पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून आहे.
www.konkantoday.com