- पाच कोटी 87 लाखाच्या नवीन ठेवी संकलित संस्थेच्या एकूण ठेवी 245 कोटी शहात्तर लाख
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेला संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला.
ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद
नववर्ष स्वागत ठेव योजनेत नव्याने 5 कोटी 87 लाख ठेव संकलन झाले आज अखेर च्या दिवशी 65 लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. संस्थेची विश्वासार्हता शिस्तबद्ध व्यवहार नेटके व्यवहार उत्तम ग्राहक सेवा आणि अर्थकारणाचा बाज लक्षात घेत ठरवण्यात आले योग्य व्याजदर यामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांचा कल दिसून येतो असे अँड. पटवर्धन म्हणाले.कोव्हिडं प्रभावित या कालखंडात अर्थकारण काहीसे संथ झाले आहे.
संस्थेजवळ एकरूप झालेले ठेवीदार
उतरत जाणाऱ्या व्याजदरामुळे ठेवीदार गुंतवणुकीसाठी नवनवीन पर्याय शोधत असतात. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे सन्माननीय ग्राहक ठेवीदार संस्थेशी संलग्न राहात संस्थेच्या प्रत्येक ठेव योजनेला भरभरून प्रतिसाद देत असतात.
वेगवान तरीही संतुलित सातत्यपूर्ण अर्थकारण
संस्थेच्या एकूण ठेवी 245 कोटी 76 लाख झाल्या असून संस्थेची कर्जे 169 कोटी 22 लाख झाली आहेत. या कठीण कालखंडातही संस्थेने आपला सीडी रेशो साठ टक्केच्या आसपास राखण्यात संस्थेला यश प्राप्त झाले आहे. संस्थेची वसुली 99. 03% झाली असून संस्थेच्या गुंतवणुका 114 कोटी 49 लाख रुपयांच्या झाल्या आहेत. संस्थेचा स्वनिधी 31 कोटी झाला आहे. जानेवारी 22 अखेर संस्थेचा नफा सात कोटी चि वेस ओलांडून पुढे गेला आहे.
चढ्या ठेव व्याजदारा पेक्ष्या सुरक्षित विश्वासार्ह अर्थकारण
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था प्रतिवर्षी विविध ठेव योजना घोषित करून आपल्या सन्माननीय गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेविना संपूर्ण संरक्षण देत आश्वासक असे व्याजदर देउ करत आली आहे. कोणत्याही स्थितीत अतिरिक्त व्याजदर देऊन ठेवीदारांना न भुलवता अर्थकारणाचा मागोवा घेत ठेव उभारणी साठी येणारा खर्च, एकंदर अन्य खर्च, गुंतवणुकीचा दर, कर्जाचे दर, कर्जाची मागणी या सर्वांचा सर्वंकष विचार करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य काळजी घेत ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचा योग्य परतावा मिळेल अशाच पद्धतीने ठेवींचे दर ठरवले जातात .या ठेव योजना सातत्याने ठेवीदारांच्या पसंतीला पात्र ठरल्या आहेत .येत्या दोन महिन्यात पतसंस्था आपला कर्ज व्यवहार 171 कोटीच्या आसपास नेईल तर ठेवी 248 कोटी च्या आसपास पोहोचतील. संस्था आणखीन दोन नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अँड.दिपक पटवर्धन यांनी दिली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना अँड. पटवर्धन यांनी धन्यवाद दिले असून संस्था आर्थिक शिस्त सांभाळत विश्वासार्ह पद्धतीनेच पुढील मार्गक्रमण अधिक वेगाने करेल व ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य देईल असे सांगितले.
Back to top button