
विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक
धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक करण्यात आलंय.धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय. विद्यार्थ्यांना चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर आता भाऊला सकाळी दहा वाजता बांद्रा न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. 31 जानेवारी रोजी धारावी परिसरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी हिंदुस्तानी भाऊ हजर होता. तसा एक व्हिडीओ समोर आला होता. विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्यावर ही अटकेची कारवाई केली आहे.
www.konkantoday.com