
मोदी शासनाचे हे बजेट “डिजिटल इंडिया” चे स्वप्न अधिक वास्तवात उतरवणारे – ॲड.दीपक पटवर्धन
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडून उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय अधिक सुकर करणारे हे बजेट आहे. आभासी चलन सुरू करण्याचा निर्णय अर्थक्षेत्र, व्यापार क्षेत्रातील व्यवहारांचा वेग वाढवणार, ५ जी तंत्रज्ञानाची सुरुवात डिजिटल व्यवहारांचा वेग वाढवेल. पोस्टा मध्ये एटीएम सुविधा, कोअर बँकिंग सुविधा, ग्रामीण भागातील डिजिटल व्यवहार सुकर करतील. ६० लाख नोकऱ्यांची निर्मिती, ८० लाख घरांची निर्मिती, ३ करोड कुटुंबापर्यंत नळपाणी योजना पोहोचवण्याचा निर्धार, २५ हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती, ८ नवे रोप-वे, ४०० वंदे मातरम ट्रेन या सर्व गोष्टी दळणवळण सुविधा प्रबळ करणार आहेत. “डिजिटल इंडिया” चे स्वप्न “सबका साथ सबका विकास” तसेच “आत्मनिर्भर भारत” ही ध्येय गाठण्यासाठी अमृत मार्ग असे वर्णन या बजेटचे करता येईल. अशी प्रतिक्रिया भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com