माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली

तळकोकणातून तब्बल चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेले आणि सध्या राज्यसभेचे खासदार असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थतज्ज्ञ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा सोमवारी कणकवलीतील व्यापारी एकता मेळाव्यात ऑनलाईन भाषणात त्यांनी केली.यापुढे राजकारणविरहित कामांवर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरेश प्रभू यांच्या या घोषणेनंतर कोकणातील राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
व्यापारी मेळाव्यात ऑनलाईन भाषणात त्यांनी बोलताबोलता आपला राजकीय जीवनपट उभा केला. कोकण विकासामधील आपले योगदान त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श करून स्पष्ट केला. आपल्या राजकीय यशाचे श्रेय त्यांनी कोकणातील आणि सिंधुदुर्गातील जनतेला दिले. सुरेश प्रभू सध्या भाजपचे नेते म्हणून संबोधले जातात. तसे पाहिले तर त्यांचे राजकीय जीवन हे लोकप्रतिनिधी म्हणून अधिक प्रभावी ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराचे सुपूत्र असलेले प्रभू राजकीय शह-काटशहाच्या राजकारणापासून नेहमीच दूर राहिले
शिवसेना पक्षातून सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक मधू दंडवते यांचा पराभव केला. त्याचवेळी त्यावेळचे खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनाही पराजित केले. ‘आपण विजयी झालो या आनंदापेक्षा प्राध्यापक मधू दंडवते यांचा आपल्याकडून पराभव झाला याचे दु:ख अधिक होते’ अशा भावनाही त्यांनी सोमवारी बोलताना व्यक्‍त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button