
महामार्गावरील कामातील त्रुटी दूर करणार, सामाजिक कार्यकर्ते शीलभद्र जाधव यांचे उपोषण मागे
चिपळूण येथे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात असलेल्य त्रुटी दूर केल्या जातील असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शीलभद्र जाधव यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले.महामार्गाचे काम सुरू होवून १३ वर्षाचा काळ लोटला आहे. तरीही ते पूर्ण झालेले नाही. त्यातच रस्त्यावर पडलेले खड्डे, हायव्हर्जनचे नसलेले फलक, चौकाचौकात वाहतूक नियंत्रणाच्या कोणत्याही नसलेल्या उपाययोजना आदी प्रकारामुळे अपघात वाढले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे.www.konkantoday.com