
जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळल्यानंतर नितेश राणे पुन्हा हायकोर्टात धाव घेणार
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष हल्ला प्रकरणात नितेश राणेंचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळल्यानंतर नितेश राणे पुन्हा हायकोर्टात धाव घेणार आहेत.पहिल्यांदा नितेश राणेंचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर हायकोर्टानेही नितेश राणेंचा जामीन फेटाळला. त्यानंतर राणे सुप्रीम कोर्टात गेले. तिथेही त्यांची निराशा झाली. आणि आज पुन्हा सत्र न्यायलायत राणेंची चौथ्यांदा निराशा झाली. आता पुन्हा ते हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दहा दिवासांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस कोठडी नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंना अटक करायाची आहे, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले आहेत.
www.konkantoday.com