
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.
www.konkantoday.com