सावर्डे येथील दाम्पत्याने डिझेल ओतून घेतले पेटवून

चिपळूण-सावर्डे येथे अज्ञात कारणातून स्वतःला पेटवून घेतलेल्या दाम्पत्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी 12. वा. सुमारास घडली. अरूण सुभाष ठाकरे (वय 35) आणि शीतल अरुण ठाकरे (वय 31, दोन्ही रा. भुवडवाडी, सावर्डे ता. चिपळूण ) असे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी आपल्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले आहे. त्यांनी स्वतःला पेटवून का घेतले याचे कारण समजू शकलेले नसून याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button