स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना कागदावरच अपघात ग्रस्त रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित
*स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची घोषणा करून सव्वा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली नाही. त्यामुळे अनेक रस्ते अपघातातील रुग्णांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. या वर्दळी मध्ये विविध प्रकारचे रस्ते अपघातही घडत आहेत अनेकदा रस्ते अपघातात रुग्णांना उपचाराअभावी जीवही गमवावा लागतो. या अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ते अपघात विमा योजना सुरू केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला आरोग्य विभागाने मान्यता देऊन १४ ऑक्टोबर २०२० पासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. याचा मूळ उद्देश रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळू शकेल व यातून रुग्णांचे प्राण वाचविता येतील. रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या बहात्तर तासांसाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयांमधून ७४उपचारपद्धती या योजनेतून दिल्या जाणार आहेत.असे जाहीर झाले होते. मात्र प्रत्यक्षात ही योजना अमलात आणली नसल्याने ही योजना अद्यापही रेंगाळत राहिली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालय अंगीकृत करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे अध्यक्ष बाबा ढोल्ये,महासचिव श्रीकांत दळवी,सरचिटणीस संजय पुनसकर,सहचिटणीस मनोहर गुरव,युवाध्यक्ष निलेश आखाडे, आदीनी शासनाच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. रस्ते अपघातात अनेक रुग्णही उपचारामुळे दगावतात जर ही योजना सुरु केली तर याचा अनेक अपघातग्रस्त रुग्णांना लाभ मिळू शकेल. परंतु योजनाच अमलात आणण्यासाठी चालढकल केली जात असल्याने रुग्णांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तर दुसरीकडे अनेकांना अपघात घडल्यानंतर उपचारासाठी रुग्णांना जास्त पैसे भरून उपचार घ्यावे लागत आहेत. ही योजना सुरु करण्यात यावी यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडेही याचा पाठपुरावा समविचारीने सुरू केला आहे या योजनेच्या संदर्भात माहिती मागविण्यात आली होती. मात्र ही योजना सुरु करण्यासाठी काही कालावधी आणखी लागणार असल्याचे उत्तर आरोग्य विभागाने दिले असल्याची माहिती समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी दिली आहे.
www.konkantoday.com