रत्नागिरी जिल्ह्यात शाळा 1फेब्रुवारीपासून सुरु; प्रशासनाने काढले आदेश
रत्नागिरी जिल्ह्यात पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. 1 फेब्रुवारीपासून या शाळांची घंटा वाजणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून 24 जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने आदेश काढून आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com