दांडेआडोम येथे उभारणार सौरऊर्जेवर वीज निर्मिती प्रकल्प : ना. उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
दांडेआडोम येथील घनकचर्यासाठी राखीव असलेल्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. येथील वीज निर्मितीचा वापर सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा रूग्णालय यांच्यासाठी केला जाईल. यातून बचत होणार्या निधीचा वापर विकासकामांसाठी होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील कचरा प्रकल्प आता दोन टप्प्यात एमआयडीसीमध्ये उभारला जाणार आहे. यातील एक टप्पा कार्यान्वित असून त्याठिकाणी जैविक खत प्रकल्पही सुरु आहे. या प्रकल्पासाठी राखीव ठेवलेल्या दांडेआडोम येथील जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येथील वीज निर्मितीचा वापर सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा रूग्णालय यांच्यासाठी केला जाणार आहे.