हातपाटी वाळू उपशा संदर्भात राज्य शासनाच्या बदललेल्या धोरणात खासदार सुनिल तटकरे यांची निर्णायक भूमिका
सावित्री नदी रेती उपशासंदर्भात राज्य शासनाचे बदललेले धोरणामुळे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील हातपाटी वाळू व्यवसाय करता यावा, याचबरोबर सर्वसामान्यांना कमी दराने बांधकामासाठी वाळू उपलब्ध व्हावी याकरिता गेल्या तीन महिन्यापासून खासदार सुनिल तटकरे राज्य शासनाकडे धोरण बदलासाठी आग्रही राहिल्याने दोन्ही जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक व जनता यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी केले. www.konkantoday.com