सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर
भाजपा आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला.यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणेही सोबत आहेत. यावेळी नितेश राणे नियमित जामीनसाठी अर्ज करतील. नितेश राणेंसोबत त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित आहेत आता पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com