
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी मंजूर केलेला कोकणातील पहिला रेल्वे कोच बनविण्याचा लवेल येथील कारखाना प्रगती पथावर
खेड : माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी कोकणात म्हणजे खेड लोटे एमआयडीसीमध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना मंजूर केला. लोटे लवेल येथील 45 एकर जमीन अधोरेखित करून घेऊन रेल्वेच्या ताब्यात दिली. यामुळे वेल्डर, मोलडींग टेक्निशियन, वायरमन, रंगारी, प्लंबर, फोम मेकर, फिटर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या कारखान्यात 2022 ते 2023 मध्ये उत्पादन करण्यास सुरुवात होईल, असे नियोजन झाले आहे. केंद्र सरकारचा प्रत्यक्ष सहभाग असणारा कोकणातील पहिलाच प्रकल्प साकार होत आहे. प्रभू रेल्वे मंत्री असताना रेल्वे कोच आयात केले जात होते. मोदींनी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया नारा दिला. ज्या ठिकाणी चीन वर्षाला 1200 कोच बनवत होते तेथे भारत वर्षाला 1318 कोच बनवून जागतिक क्रमवारीत एक नंबरला गेला. 450 कोटींचा लोट्याचा प्रकल्प असून दोन टप्पे पूर्ण होत आले आहेत. यांची आर्थिक तरतूद प्रभूंनी पहिल्यांदाच करून ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंनी रेल्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. आत्मनिर्भर रेल्वे! आत्मनिर्भर भारत! हे समीकरण जुळवून जगाचे लक्ष रेल्वेकडे आकर्षित केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली. आधुनिकतेचे तंत्रज्ञान भारतात येऊ लागले. याचेच हे उदाहरण आहे.
www.konkantoday.com