
ठेके मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन : भाजपाचा पत्रकार परिषदेत आरोप
चिपळूण : महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन म्हणजे महामार्गाचे नवे ठेके मिळविण्याचा फंडा आहे. एकीकडे भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्गातील रस्त्याची कामे पूर्ण झाल्याचे ते मान्य करतात. मात्र, चिपळूण ते रत्नागिरी येथील काम का रखडले? मुख्य ठेकेदारांकडून पोट ठेकेदार म्हणून कामे कोणाची आहेत? हे आंदोलनकर्त्यांनी जाहीर करावे, अशी भूमिका भाजपाच्या पदाधिकार्यांनी चिपळुणात पत्रकार परिषदेत मांडली. भाजपच्या चिपळूण येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शहर अध्यक्ष आशिष खातू, माजी स्वीकृत नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com