राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना महिला आंदोलकांची समजूत काढण्यासाठी चक्क झाडावर चढावे लागले
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थेट झाडावर चढत आंदोलक महिलांशी चर्चा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र त्यांच्याच चर्चा रंगल्याचे दिसून आले.महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी बीड नगरपरिषदेच्या काही कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्याबीड नगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेत नसल्याने दोन महिला कामगारांनी कंटाळून झाडावर चढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात बीडचे धनंजय मुंडे यांना त्या आंदोलक महिला झाडावर चढल्याचे दिसल्या. हे पाहून धनंजय मुंडेनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. या वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार क्षीरसागर यांनी महिलांसोबत चर्चा करण्यासाठी थेट स्वतः झाडावर चढले आणि महिला कर्मचाऱ्यांना झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली व त्यांना खाली आणले
www.konkantoday.com