राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता

पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानत घट राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button