
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी
रत्नागिरी : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आज रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली.
पालकमंत्री ॲङ परब यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामा संदर्भात मुंबई येथे पुढच्या आठवडयात संबधित विभागाचे अधिकारी, आर्कीटेक्ट, ठेकेदार यांच्यासोबत बैठक लावण्यात येत असून त्याच्यांशी चर्चा करुन प्राधान्याने हे काम सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील . जिल्हयातील इतर बस डेपो संदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे ते म्हणाले.
यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय अभियंता श्रीमती इनामदार, आगार व्यवस्थापक रमाकांत शिंदे, विभागीय वाहतूक अधीक्षक अनंत जाधव आदि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com