देवरुखमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे भिक मागो आंदोलन

देवरूख : बाजारपेठ येथे देवरूख आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी भीक मागो आंदोलन केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, यांसह विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गत तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे एसटी कर्मचारी तीन महिने पगारापासून वंचित आहेत. यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा असा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला असल्याचे बोल एसटी कर्मचाऱ्यांमधून उमटत आहेत. देवरूख आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी देवरुख बाजारपेठेत प्रत्येक दुकानात जाऊन भीक मागो आंदोलन केले. हातात फलक घेऊन विविध घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समीर शिंदे, दिलीप चव्हाण, आनंद दांडेकर, समीर खेतल, सुरेश शेळके, समीर खैरे, विवेक नलावडे, मिलिंद सोनवडेकर, आप्पा कोळी, सचिन कांबळे, विलास पेंढारी, प्रमोद निंबाळकर, विकास गंगावणे, शिवाजी पडघान यांसह एस. टी. कर्मचारी सहभागी झाले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button