
दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला
कोकण रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच विजेवर धावली दिवा -रत्नागिरी पॅसेंजर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला. विशेष म्हणजे या गाडीचे सारथ्य रत्नागिरीच्या सुपुत्रांनी केले. गाडीचा लोको पायलट, सहायक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत.
गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली इलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.
www.konkantoday.com