दिल्लीहून मुंबईत सात कोटींच्या बनावट नोटा आणणार्‍या टोळीला दहिसर चेकनाक्यावर अटक ,मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाची कारवाई

मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने दहिसर चेक नाक्यावर मोठी कारवाई करत 2000 रुपयांच्या सात कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून 7 मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, 28170 रुपये रोख आणि एक लॅपटॉपही हस्तगत केले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीत या नोटा दिल्लीहून मुंबईत आणल्याचे आरोपींनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button