महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
अवघा राजपथ महाराष्ट्रमय! प्रजासत्ताकदिनी चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातीलजैव विविधते वर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.याचित्ररथाच्यामाध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन संपूर्णभारतवासीयांना घडूनआले. आजचा महाराष्ट्राच्या चित्ररथ अनेक अर्थांनीमहत्त्वपूर्ण ठरला.महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्याअग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं.युनेस्कोच्या(UNESCO)जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचासमावेशअसूनयेथेआढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही
साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या सुमारे १५
फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्षवेधूनघेतलं.याशिवायचित्ररथाच्यापुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूटउंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचेराज्यफुल ‘ताम्हण’चे सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावरछोटी छोटीफुलपाखरेही दाखवण्यातआलीआहेत.चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या तसेच शेवटच्या टप्प्यातील सुमारे १५ फुटाचं आंब्याचे झाड विशेषआकर्षक दिसत होते. त्यामुळे राजधानीत आज महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
www.konkantoday.com