प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी भा.ज.पा. शहरातील २५ नररत्नांना ‘कमळ सन्माना’ने सन्मानीत करणार – ॲड. दीपक पटवर्धन.
हिंदुस्तान स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भा.ज.पा. रत्नागिरी शहरातील २५ नागरिक बंधू-भगिनींना ‘कमळ सन्माना’ने सन्मानीत करणार आहे. समाजामध्ये राष्ट्रहीत, समाजहीत यांना प्राधान्य देऊन कार्यरत असणारे तसेच क्रीडा, शैक्षणिक प्रकारात नैपुण्य मिळवलेल्या रत्नागिरीतील नररत्नांना सन्मानीत करण्यासाठी हे आयोजन आहे. शहरातील २५ नररत्नांची नावे निश्चित करण्यात आली असून उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन भा.ज.पा. पदाधिकाऱ्यांसह २५ ‘कमळ सन्मान’ प्राप्त मान्यवरांचे घरी जाऊन कमल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करणार आहेत. हिंदूस्थानांच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये एकूण ७५ नररत्नांना सन्मानित करणार आहोत. पहिल्या टप्प्यात २५ मान्यवरांना ‘कमळ सन्माना’ने सन्मानीत करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भा.ज.पा. संचालित केंद्रशासनाने ३७० कलम रद्द केले. आयोजनामध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारणीचे कार्य सुरू करतानाच काशिविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. हिंदुस्थानाच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी ही मौल्यवान भेट म्हणावी लागेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरीकांपर्यंत पोहोचत अमृत महोत्सवी वर्षामध्ये नवचैतन्य जागवावे. राष्ट्रभावना जागृत करावी, त्याच बरोबर समाजातील सकारात्मकता, नैपुण्य या गुणांचा गुणांचा सन्मान करावा. या हेतूने कमळ सन्मान पुरस्कार भा.ज.पा. रत्नागिरी प्रदान करत आहे. अशी माहिती भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.