पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा जगाच्या नकाशावर यावा यासाठी प्रयत्न -पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर यावा यासाठी माझे निश्चित प्रयत्न राहतील असे आश्वासन रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले यासाठी जिल्हा प्रशासन व आपण महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले जगातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत ते आणण्यासाठी या वर्षात प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले सिंधू रत्न योजनेचा जास्तीत जास्त रत्नागिरीकरांना लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत रत्नागिरी जिल्हा मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्हा आहे यासाठी या जिल्ह्यात मत्स्यबीज केंद्र सुरू व्हावे असा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com